Home Breaking News इंदुरीकर महाराजांचे कीर्तन होणार की नाही..!

इंदुरीकर महाराजांचे कीर्तन होणार की नाही..!

● सोमवारी केलेल्या वक्तव्यामुळे साशंकता

2231
C1 20231031 18043430

सोमवारी केलेल्या वक्तव्यामुळे साशंकता

Indurikar maharaj news | निवृत्‍ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन 3 नोव्‍हेंबरला येथील शासकीय मैदानावर करण्‍यात आले आहे. परंतु राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असल्याने त्यांनी पाच दिवस कार्यक्रम करणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे कार्यक्रमाबाबत साशंकता असून कीर्तन होणार की नाही याबाबत दिनांक 1 नोव्हेंबरला चित्र स्पष्ट होईल. Kirtana of Nivritti Maharaj Indurikar has been organized on November 3.

Img 20250521 wa0020

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच धुमसतोय, समाजबांधव प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यातच निवृत्‍ती महाराज इंदुरीकर यांनी पाच दिवस कोणताच कार्यक्रम करणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. दिनांक 3 नोव्हेंबरला येथील शासकीय मैदानावर होणार असलेल्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत आहे.

Img 20250103 Wa0009

इंदुरीकर महाराज यांचे किर्तन म्‍हणजे लोटपोट हास्‍यांचे फवारेच असतात. महिलां, विद्यार्थी तर अबाल वृध्‍दांपर्यत किर्तनातुन मारण्‍यात येणारे  प्रबोधनात्‍मक फटकारे त्‍यांच्‍या किर्तनाचे वैशिष्ट्य आहे. विनोदातून प्रबोधन हा निवृत्‍ती महाराज इंदुरीकर यांच्‍या किर्तनाचा गाभा असल्याने परिसरातील नागरिकांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे.

गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी आणि रेणुका ईरीगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टीकाराम कोंगरे यांच्या पुढाकाराने जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परंतु इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे आयोजक संभ्रमावस्थेत आहे.

आम्ही आशावादी आहोत
प्रख्यात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तन प्रथमच आपल्या परिसरात होत आहे. महत्प्रयासाने त्यांनी कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले होते. तर मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र होत असल्याने त्यांनी पाच दिवस कार्यक्रम करणार नसल्याचे जाहीर केले असले तरी दिनांक 1 नोव्हेंबरला ते कार्यक्रमाबाबतची रूपरेषा स्पष्ट करणार आहेत. यामुळे आयोजक नक्कीच आशावादी आहेत.
टीकाराम कोंगरे
माजी अध्यक्ष, जिल्हा बँक
Rokhthok News

Previous articleसुशिला दाऊपूरे यांचे निधन
Next articleतो फोन… आणि कोंबडबाजारात जुगाऱ्यांची ‘पळापळ’
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.