Home Breaking News MNS : विदर्भ केसरी शंकरपटचा थरार

MNS : विदर्भ केसरी शंकरपटचा थरार

● भव्य आयोजनाची जय्यत तयारी

C1 20260323

भव्य आयोजनाची जय्यत तयारी

Wani News | विदर्भाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि ग्रामीण खेळांचा वारसा जपणारा शंकरपट पुन्हा एकदा वणीच्या मातीत रंगणार आहे. शंभू फॅन्स क्लबच्या वतीने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून ‘मनसे विदर्भ केसरी शंकरपट 2026’ या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. MNS: The thrill of Vidarbha Kesari Shankarpat

ही स्पर्धा दि. 22, 23 व 24 मार्चला वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान येथे पार पडणार असून, यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. विदर्भातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा शंकरपट बैलगाडा प्रेमींसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

आयोजित बैलगाडा शर्यतीसाठी राज्यभरातून शेकडो बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि पारंपरिक खेळांची परंपरा टिकून राहावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Img 20250103 Wa0009

या स्पर्धेत ‘विदर्भ केसरी’ हा मानाचा किताब कोणत्या बैलजोडीला मिळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. स्पर्धेदरम्यान रोमांचक सामने आणि वेगवान धावांची चुरस पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्येही उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असून, राजु उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. स्पर्धेसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधांची चोख व्यवस्था करण्यात आली असून, वणीकरांसह परिसरातील नागरिकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे.
Rokhthok