Home Breaking News Raj Thackeray : मनसेच्या बालेकिल्ल्यात येतोय “हिंदू जननायक”

Raj Thackeray : मनसेच्या बालेकिल्ल्यात येतोय “हिंदू जननायक”

● महाराष्ट्र सैनिकात संचारला उत्साह

C1 20240817 08413050

महाराष्ट्र सैनिकात संचारला उत्साह

MNS NEWS | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नवनिर्माण यात्रा संपूर्ण राज्यात धडाक्यात सुरू आहे. विदर्भातील मनसेच्या वणी ह्या बालेकिल्ल्यात 23 ऑगस्टला महाराष्ट्र सैनिकात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी “हिंदू जननायक” धडकतोय. राज ठाकरेंच्या होत असलेल्या आगमनाने महाराष्ट्र सैनिकात प्रचंड उत्साह संचारला आहे. Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray’s Navnirman Yatra is going on with a bang across the state.

Img 20250103 Wa0009

वणी विधानसभा मतदारसंघात मनसेचे चांगले प्राबल्य आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांनी अतिशय नियोजनबद्ध संघटनात्मक बांधणी केली आहे. राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित तरुणाई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आकर्षित होताना दिसते आहे. यामुळेच विधानसभा क्षेत्रात पक्ष प्रवेशाचा झंझावात सुरू आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत “एकला चलो रे” ची भूमिका अवलंबली आहे. अवघ्या दोन महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य उमेदवारांना निवडून आणायचे असा संकल्प महाराष्ट्र सैनिकांनी केला आहे, त्यांच्यात ऊर्जा निर्माण व्हावी याकरिता विदर्भात “नवनिर्माण यात्रा” 21 ते 26 ऑगस्ट या कालावधीत होत आहे.

पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नवनिर्माण यात्रेचा ताफा 23 ऑगस्टला वणीत धडकणार आहे. हॉटेल जन्नत मध्ये सकाळी 10 वाजता निरीक्षक व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर 11 वाजता राज ठाकरे यांचे टिळक चौकात भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तसेच शिवमुद्रा कार्यालयात प्रतिष्ठित मान्यवरांची बैठक घेण्यात येणार आहे. याप्रसंगी मनसे नेते राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे बोलल्या जात आहे.
ROKHTHOK NEWS