Home Breaking News मनसेच्या ढाण्या वाघाची मुंबईत “डरकाळी”

मनसेच्या ढाण्या वाघाची मुंबईत “डरकाळी”

● पदाधिकारी मेळाव्यात डागली तोफ ● शेतकरी, युवा बेरोजगारांसाठी तळमळ

1214
C1 20241014 22125705

पदाधिकारी मेळाव्यात डागली तोफ
शेतकरी, युवा बेरोजगारांसाठी तळमळ

Political News | वणी विधानसभेतील तडफदार नेतृत्व, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकरांनी व्यासपीठ गाजवले. मुंबईत मनसेने पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी शेतकरी, युवा बेरोजगार, आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराबाबत तळमळ व्यक्त करत शासनावर ताशेरे ओढले. वणीतील मनसेच्या ढाण्यावाघाने मुंबईत डरकाळी फोडल्याने मेळाव्यात चैतन्य निर्माण झाले. Maharashtra Navnirman Sena leader Raju Umbarkar graced the stage.

Img 20250422 wa0027

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहे. राजकीय पक्ष आपापली रणनीती आखताहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने “एकला चलो रे” ची भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्र सैनिकांत उत्साह संचारला आहे. त्यातच पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महत्वपूर्ण नेत्यांची उमेदवारी जाहीर केली आहे, यात मनसे नेते राजू उंबरकर यांचा समावेश आहे.

Img 20250103 Wa0009

मुंबईत पार पडलेल्या पदाधिकारी मेळाव्यात राजू उंबरकर यांनी तडाखेबाज भाषण करून राज्यातील शेतकरी, युवा बेरोजगार यांच्या व्यथा तडफेने मांडल्या. आत्महत्या केलेल्या शेतकरी परिवाराची स्थिती कथन करताना त्यांचे डोळे पाणावले. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम व्हावी, जीन्स पॅन्ट घालून ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी असावा असे स्वप्न राज ठाकरे यांचे आहे. याकरिता महाराष्ट्र सैनिकांनी आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावे असे आवाहन उंबरकरांनी केले.

पदाधिकारी मेळाव्यात उंबरकरांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. शासनाच्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याचे स्पष्ट करत मतदारसंघातील एका शेतकऱ्याला केवळ सतरा रुपये पीक विमा मिळाला. ही काय थट्टा आहे, त्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आणि हाती सतरा रुपये. हे थोतांड खपवून घेतल्या जाणार नसल्याचे स्पष्ट करत “राज सरकार” महाराष्ट्रात स्थापित व्हावे तरच राज ठाकरे यांचे राज्याबाबतचे “व्हिजन” पूर्ण होणार असल्याचे उंबरकर यांनी स्पष्ट केले.
ROKHTHOK NEWS