● अंतर्गत सर्व्हेत भाजपला मतदारांची पसंती
● रणनीती, नियोजन आणि तडफदार प्रचारामुळे भाजप आघाडीवर
Political News :
वणी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून नगराध्यक्ष पदाची लढत यावेळी सप्तरंगी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अपक्ष उमेदवार उमा विठ्ठलराव राजगडकर यांनी माघार घेतल्यानंतर आता सात उमेदवार रिंगणात असून मतदारांचे लक्ष या “सप्तरंगी” लढतीकडे खिळले आहे. Who will win the seven-color race for the post of mayor?!
दरम्यान, स्थानिक पातळीवरील अंतर्गत सर्व्हेत भाजपला मतदारांची लक्षणीय पसंती मिळत असल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत. शाश्वत विकासाचा अजेंडा, संघटित पक्षयंत्रणा आणि नियोजनबद्ध प्रचार या त्रिसूत्रीच्या बळावर भाजपने सध्या आघाडी घेतल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे.
माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रत्येक प्रभागात प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवून प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे. शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी हे नगराध्यक्ष पदाच्या तडफदार उमेदवार विद्या आत्राम व नगरसेवक उमेदवारांमध्ये समन्वय साधत प्रचाराचा धडाका वाढवत आहेत.
राज्यस्तरीय मातब्बर नेत्यांच्या सभा, रोड शो, गृहभेटींसाठीही स्थानिक नेतृत्व सक्रिय झाले असून विजयासाठी पक्षाने सर्व शक्तीनिशी झोकुन दिले आहे. पालिकेवर पुन्हा एकहाती सत्ता स्थापनेसाठी भाजपची मोहीम निर्णायक टप्प्यात पोहचली आहे. “सप्तरंगी” लढतीत कोण बाजी मारणार हे काही दिवसांत स्पष्ट होणार असले तरी सध्यस्थितीत भाजपने मारलेली जोरदार मुसंडी, शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
Rokhthok






