Home Breaking News शिलाताई बिलोरिया यांचे दुःखद निधन

शिलाताई बिलोरिया यांचे दुःखद निधन

● रविवारी वणीत होणार अंत्यसंस्कार

C1 20241012 12414034

रविवारी वणीत होणार अंत्यसंस्कार

Sad News | येथील क्षत्रिय छिपा समाजाचे अध्यक्ष व्यावसायिक तथा व्यावसायिक राजाभाऊ बिलोरिया यांच्या सौभाग्यवती शिलाताई बिलोरिया यांचे दिल्ली येथे उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी त्या 61 वर्षाच्या होत्या. The sad demise of Shilatai Biloria

शिलाताई ह्या हसतमुख स्वभावाच्या होत्या, बिलोरिया परिवारातील त्यांची वागणूक आपलेपणाची आणि कर्तव्यनिष्ठेची होती. त्यांनी नुकत्याच पारपडलेल्या समाजाच्या मेळाव्यात मोठे योगदान दिले. प्रकृतीस्वास्थ्य बरे नसताना ही त्यांनी घेतलेला सहभाग अवर्णनीय होता.

शिलाताई मागील काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांचेवर दिल्लीत उपचार सुरू होते. शनिवार दिनांक 12 ऑक्टोबरला सकाळी प्राणज्योत मालवली. त्यांचे पश्चात पती, एक मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचेवर रविवारी वणीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
       रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Img 20250103 Wa0009
Previous articleसुमित्राबाई नाईक यांचे निधन
Next articleमनसेच्या ढाण्या वाघाची मुंबईत “डरकाळी”
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.