Home Breaking News त्या… खानपट्टा धारकावर गुन्हा नोंदवा

त्या… खानपट्टा धारकावर गुन्हा नोंदवा

● "शहर ए मदीना" संघटनेची मागणी

904

“शहर ए मदीना” संघटनेची मागणी

Wani news | तालुक्‍यातील वांजरी येथे दगडाचे उत्‍खनन केलेल्‍या खाणीत बुडून तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. निष्‍पाप बालकांच्‍या मृत्यूस खानपट्टा धारकच असल्‍याचा आरोप “शहर ए मदीना” संघटनेचे रज्‍जाक पठाण यांनी केला आहे. त्या खानपट्टा धारकावर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्हा नोंदवून शासनाच्या वतीने मृतक बालकांच्या परिवाराला आर्थिक मदत कारवी अशी मागणी उप विभागीय अधिकारी (SDO) यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. Razzak Pathan has accused Khanpatta holder of the death of innocent children.

Img 20250422 wa0027

आसीम अब्‍दुल सत्‍तार, नुमान शेख साबीर शेख तसेच प्रतिक संजय मडावी अशी वांजरी येथील खदाणीत मृत्युमुखी पडलेल्या बालकांची नावे आहेत. 16 -17 वर्षीय तीन बालकांच्या अनपेक्षित मृत्यूने संपूर्ण शहर हादरले आहे. मात्र शोकाकुल परीवारास प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच खदान मालकाने साधे भेटण्‍याचे सौजन्‍य दाखविले नाही. असा आरोप निवेदनातुन करण्‍यात आला आहे.

Img 20250103 Wa0009

तालुक्‍यातील वाजंरी येथील खदान अविनाश वारवटकर हे चालवित आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडाचे उत्खनन करण्‍यात आल्‍याने निर्माण झालेल्या त्या खड्डयाला तलावाचे स्वरूप आले आहे. पावसाळ्यात खाण बंद असली तरी सुरक्षेविषयी कोणतीही खबरदारी खानपट्टा धारकाने घेतली नाही. खाणीच्‍या सभोवताल तारेचे कुपंण केले नाही, सुरक्षा रक्षकाचा पत्ताच नाही. यामुळे निष्‍पाप बालकांचा जीव गेल्‍याचे निवेदनात नमुद करण्‍यात आले आहे.

उपविभागातील भुगर्भात मोठ्या प्रमाणात मौल्‍यवान खनिज आहे. महसुल विभागाने अनेकांना खानपट्टे वितरीत केले आहे. मात्र गौणखनिज उत्‍खननावर महसुल विभागाचे नियंत्रण असल्‍याचे दिसत नाही. अधिकाऱ्यांच्या डोळयात धुळ फेकुन काही खान पट्टेधारक बिनधास्त अवैद्य उत्‍खनन करताहेत.

वणी उपविभागातील खान पट्टेधारकावर खनिकर्म विभागाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. महसूल प्रशासन निद्रावस्थेत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. नियमबाह्यरीत्या उत्खनन करून करोडो रुपयांचा शासनाचा महसूल गिळंकृत करताहेत. खनिजाचे उत्खनन करून निर्माण झालेले खड्डे “मृत्यूकुंड” झाले आहे. त्या खानपट्टा धारकांच्या खाणीचे वरिष्ठ पातळीवरून मूल्यांकन होणे गरजेचे आहे.

जिल्हाधिकारी, खनिकर्म विभाग यांनी घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने कठोर कारवाई करावी व घटना ज्या खदाणीत घडली त्या खानपट्टा धारकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा आणि पीडित परिवाराला आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी मोठ्या संख्‍येने संघटनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Rokhthok News