● वणी पोलिसांचा तपास सुरू
Sad News | वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला एका निर्जन स्थळी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही बाब मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर ला सकाळी उघडकीस आली. मृतकाची ओळख पटलेली नसल्याने वणी पोलीस तपास करत आहे. The body was found hanged

सकाळी प्रत्यक्षदर्शीना गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांना सूचना देण्यात आल्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर त्यांनी पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Rokhthok News