Home Breaking News समाजा-समाजात विष पेरण्याचं काम सुरू..!

समाजा-समाजात विष पेरण्याचं काम सुरू..!

● मनसे नेते राजू उंबरकर कडाडले ● भव्य आदिवासी चौताली दंडार स्पर्धा

703
C1 20240108 13202768

मनसे नेते राजू उंबरकर कडाडले
भव्य आदिवासी चौताली दंडार स्पर्धा

Wani News : विदर्भाचे रॉबिनहुड श्यामदादा कोलाम यांच्या 144 व्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना झरी तालुकाच्या वतीने भव्य चौताली दंडार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना मनसे नेते राजू उंबरकर कडाडले. सध्यस्थीतीत राज्यात समाजा-समाजात विष पेरण्याचं काम सुरू असल्याचे सांगत केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व जाती धर्म एकत्र बांधून संस्कृती जोपासत असल्याचे स्पष्ट केले. A grand Chautali Dandar competition was organized.

Img 20250422 wa0027

C1 20240108 13195020

विदर्भाचे रॉबिनहुड श्यामदादा कोलाम यांच्या 144 व्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य आदिवासी चौताली दंडार स्पर्धेचे आयोजन भिमनाळा येथे करण्यात आले होते. आदिवासी समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने उंबरकर यांचे स्वागत केले.

Img 20250103 Wa0009

C1 20240108 13191385

वणी विधानसभा क्षेत्रात आदिवासी समाज बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जतन करण्याच्या उद्देशाने तसेच शैक्षणिक जागृती व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा, थोर संतांचे, महापुरुषांचे विचार घराघरात पोहचावे, त्याचप्रमाणे अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सामाजिक प्रबोधन व्हावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चौताली दंडार स्पर्धेनिमित्ताने गावात रोगराई, नैसर्गिक आपत्ती, संकटे येऊ नये यासाठी गावबांधणी अथवा गाव पूजन केले जाते. या दंडार स्पर्धेत सामाजिक संदेश, उपक्रम, नृत्य याचे आयोजन केले जाते यात अनेक कलाकार सहभागी होऊन संस्कृती जोपासण्यासाठी हातभार लावत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व जाती धर्माला एका छत्राखाली आणून महाराष्ट्राला एकसंध ठेवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असल्याचे सांगितले. यापुढील काळात आदिवासी दंडार संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी मनसेच्या माध्यमातून सातत्याने पुढाकार घेऊन ही संस्कृती जोपासण्यासाठी कटिबद्ध असेल, असा विश्वास आदिवासी समाज बांधवांना राजू उंबरकर यांनी दिला.
Rokhthok News

Previous articleपत्रकार दिन उत्साहात साजरा
Next articleपणनच्या संचालकपदी ”संजय खाडे”
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.