Home Breaking News तरुणांवर चाकूने सपासप वार, जागीच ठार

तरुणांवर चाकूने सपासप वार, जागीच ठार

● पुन्हा हत्या, यवतमाळ हादरले ● चार तासात आरोपी ताब्‍यात ● स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

IMG 20260522 WA0013

पुन्हा हत्या, यवतमाळ हादरले
चार तासात आरोपी ताब्‍यात
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

crime news yavatmal | यवतमाळ शहर गुन्‍हेगारांचे माहेरघर झाले आहे, लहानसहान कारणावरुन होणाऱ्या हत्‍या, पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरतांना दिसत आहे. विश्‍वकर्मा नगर येथे तीन युवकांनी धारदार शस्‍ञाने सपासप वार करत नितीन देसाई नामक तरुणांची निर्घृण हत्‍या केली. ही घटना रविवार दि. 16 जुलैला घडली असुन स्थानिक गुन्हे शाखेच्‍या पथकांनी (LCB) अवघ्‍या चार तासात दोन आरोपींच्‍या मुसक्‍या आवळल्‍या आहेत. Three youths brutally killed a youth named Nitin Desai by stabbing him with a sharp knife.

त्रीशय उर्फ सावन सुरेश राठोड (20) रा. विश्वकर्मा नगर,  पिंपळगांव, ऋषीकेश उर्फ बिल्ला अभय काळे (20) रा. बुटले लेआऊट पिंपळगांव असे ताब्‍यातील आरोपींचे नावे आहेत. तर रोहीत मडकाम याचा शोध घेण्‍यात येत आहे. घटनेच्‍या दिवशी तीन तरुणांनी नितीन देसाई याचेवर चाकुने सपासप वार केले यात तो गंभीर जखमी झाला तर अती रक्‍तस्‍ञावामुळे त्‍याचा घटनास्‍थळीच मृत्‍यू झाला.

IMG 20260511 WA0005

घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्‍या पथकाला मिळताच त्‍यांनी घटनास्‍थळ गाठले. हत्‍येतील आरोपींना शोधण्‍याचे आव्‍हान पोलीसांसमोर होते. अवघ्‍या चार तासात दोन आरोपींच्‍या मुसक्‍या आवळल्‍या. त्‍यांना बोलते केले असता गुन्ह्याची कबुली देण्‍यात आली आहे. तिसरा आरोपी पसार झाला असुन त्‍याचा शोध घेण्‍यात येत आहे.

Img 20250103 Wa0009

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात LCB प्रमुख आधारसिंग सोनोने, API विवेक देशमुख, API संतोष मनवर, बंडु डांगे, पोहवा सैयद साजीद, रुपेश पाली, अजय डोळे, विनोद राठोड, निलेश राठोड, रितुराज मेडवे, धनंजय श्रीरामे, जितेंद्र चौधरी यांचे पथकाने पार पाडली आहे.
ROKHTHOK NEWS