Home Breaking News Maha Arogya Camp | हजारो रूग्‍णांनी घेतला लाभ

Maha Arogya Camp | हजारो रूग्‍णांनी घेतला लाभ

● विविध आजाराची तपासणी

C1 20250120 19281855

● विविध आजाराची तपासणी
Wani News |- हिंदुहृदयसम्राट, शिवसेना प्रमुख, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्‍या जयंतीनिमीत्‍य व आमदार संजय देरकर यांच्‍या वाढदिवसाचे औचित्‍य साधुन येथील शिक्षक प्रसारक मंडळ शाळेच्‍या प्रांगणात भव्‍य महाआरोग्‍य शिबीराचे Maha Arogya Camp आयोजन करण्‍यात आले होते.रविवार दिनांक 19 जानेवारीला पार पडलेल्‍या या शिबीराचा विवीध आजार असलेल्‍या हजारो रूग्‍णांनी लाभ घेतला आहे. Thousands of patients with various diseases have benefited from the Maha Arogya camp.

आयोजीत महाशिबीराचे उदघाटक म्‍हणुन आमदार संजय देरकर तर अध्‍यक्षस्‍थानी माजी नगराध्‍यक्ष विजय मुकेवार हे होते. तर प्रमुख अतीथी म्‍हणुन शिवसेना (उबाठा) चे उपजिल्‍हा प्रमुख संजय निखाडे, शरद ठाकरे, दिपक कोकास, संतोष माहूरे, सावंगी मेघे येथील शशांक गोतरकर, डॉ. एन पी शिंगने, सुनिल कातकडे,  सुधिर थेरे यांची उपस्‍थीती होती.

यावेळी सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्‍णालय, वणी तालुका आरोग्‍य विभाग व ग्रामीण रूग्‍णालय वणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित या शिबीरात सहभाग घेतला होता. यावेळी विविध आजाराचे तीन हजाराच्‍या वर रूग्‍ण सहभागी झाले होते. या शिबिरात विविध आजाराची तपासणी करून त्‍यांची विनोबा भावे रूग्‍णालय येथे शस्‍त्रक्रीया होणार आहे.

आयोजित Maha Arogya Camp महाआरोग्‍य शिबीरामध्‍ये वणी ग्रामीण रूग्‍णालयाचे अधिक्षक डॉ. धमेंद्र सुलभेवार, डॉ.विवेक गोफणे, डॉ. समीर थेरे, डॉ. अर्चना देठे, डॉ. मोहन गेडाम, डॉ. सुभाष इंगळे, डॉ. विलास बोबडे, बाळु दुधकोहळे, आशा सेविका आरोग्‍य सेवक यांनी परीश्रम घेतले.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009