Home Breaking News तुल्यबळ लढतीत उंबरकर, देरकर, निखाडे, नांदेकर ठरणार प्रभावी

तुल्यबळ लढतीत उंबरकर, देरकर, निखाडे, नांदेकर ठरणार प्रभावी

● वणी विधानसभा "टर्निंग पॉईंट"

1494
C1 20240417 17210882

वणी विधानसभा “टर्निंग पॉईंट”

सुनील पाटील -वणी | चंद्रपुर- वणी- आर्णी लोकसभेच्‍या निवडणुकीत प्रचार यंञणा अंतीम टप्‍यात आहे. अवघ्‍या काही तासानंतर मतदान होणार आहे. मतदारसंघ निहाय “फिल्‍डींग” उमेदवारांनी लावली आहे. तुल्‍यबळ निवडणुकीत कोण बाजी मारणार हे अधांतरी असले तरी वणी विधानसभेत महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी मनसेचे नेते राजु उंबरकर प्रचारात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीच्‍या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्‍या प्रचारार्थ शिवसेनेचे संजय देरकर, उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे व शिवसेना जिल्‍हा प्रमुख विश्‍वास नांदेकर सक्रिय झाले आहेत. Umbarkar, Derkar, Nikhade, Nandekar will be effective in a loksabha election.

Img 20250422 wa0027

चंद्रपुर -वणी -आर्णी लोकसभेच्‍या निवडणुकीतील राष्‍ट्रीय पक्षाचे दोन्‍ही उमेदवार नवखे आहेत. राजकारणाची पार्श्‍वभूमी असली तरी लोकसभेच्‍या आखाडयात उतरणे अवघड असते हे आज त्‍यांना उमगले असेल. सहा विधानसभा मतदारसंघातील नेते, कार्यकर्ते यांना सांभाळणे फार मोलाचे व जिकरीचे असते याचा प्रत्‍यय कदाचीत ‘त्‍या’ उमेदवारांना आला असेलच.

Img 20250103 Wa0009

वणी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे प्राबल्‍य आहे, मागील नऊ वर्षापासुन आ. संजीवरेडडी बोदकुरवार यांनी विविध विकास कामे केली आहेत. शेकडो कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात खेचुन आणला आहे. वणी विधानसभेत मताधिक्‍य मिळावे याकरीता ते प्रयत्‍नशिल असले तरी विरोधक सुध्‍दा तेवढेच प्रबळ आहेत हे विसरुन चालणार नाही.

वणी विधानसभेत शिवसेनेचे चांगलेच प्राबल्‍य आहे,  या निवडणुकीत शिवसेनेचे मत निर्णायक असणार आहे. शिवसेनेचे जिल्‍हाप्रमुख विश्‍वास नांदेकर, उप जिल्‍हाप्रमुख संजय निखाडे यांचा त्‍यांच्‍या भागात चांगलाच प्रभाव आहे. तर संजय देरकर यांचा वणी विधानसभेत असलेला जनाधार विसरता येणार नाही. लोकसभा निवडणुकीत शिवसेने सोबतच अनेक पक्ष महाविकास आघाडी सोबत आहे. काही कॅडरबेस पक्ष स्‍वताः निवडणुक रणसंग्रामात उतरले आहे.

लोकसभेच्‍या सार्वत्रिक निवडणुकीत ऐनवेळी प्रवेशीत झालेल्‍या महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे वणी विधानसभेत चांगलेच प्रस्‍थ आहे. मनसे नेते राजु उंबरकर यांचे नेतृत्‍वात मनसेने प्रचंड जनाधार मिळवला आहे. तरुणाई सोबतच महिलांची फळी मनसेने निर्माण केली आहे. मनसेचा प्रचंड फायदा महायुतीच्‍या उमेदवाराला होणार हे विसरता येणार नाही.

चंद्रपुर- वणी- आर्णी लोकसभेची निवडणुक अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. महाविकास आघाडी व महायुतीने ही निवडणुक प्रतिष्‍ठेची केली असली तरी कोण कोणाचा काटा काढेल हे मतमोजणीअंतीच स्‍पष्‍ट होणार आहे. “पांग या जन्‍मीच फेडाव लागतं” असं म्‍हटल्‍या जाते, त्‍याचा प्रत्‍यय येणार का ? हे बघणे औत्‍सूक्‍याचे ठरणार आहे. यामुळे तुल्‍यबळ लढतीत बाजी कोण मारणार हे कालांतराने उघड होणार आहे.
Rokhthok News