Home Breaking News मतदानावरील बहिष्‍कार मोडीत काढा..!

मतदानावरील बहिष्‍कार मोडीत काढा..!

● शिंदोला ग्रामस्‍थांचे एसडीओंना निवेदन

703
C1 20240418 09004373

शिंदोला ग्रामस्‍थांचे एसडीओंना निवेदन

Wani News | लोकसभा निवडणुकीच्‍या मतदानावर बहिष्‍कार टाकण्‍यात येईल असे आवाहन शिंदोला येथील ग्रामस्‍थांनी केले होते. माञ त्‍याच गावातील शेकडो ग्रामस्‍थांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत मतदानाचा अधिकार हा घटनात्‍मक अधिकार असल्‍याने कोणीही मतदानापासुन वंचित राहु नये यासाठी लादण्‍यात आलेला बहिष्‍कार मोडीत काढावा असे आवाहन प्रशासनाला केले आहे. The villagers of Shindola appealed to boycott the Lok Sabha elections.

Img 20250601 wa0036

शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख संजय निखाडे यांचे नेतृत्‍वात शिंदोला येथील महिलां व नागरीकांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. शिंदोला या गावातील 70 टक्‍के ग्रामस्‍थ निवडणुकीवर बहिष्‍कार टाकु नये अशा भुमिकेत आहेत तर उर्वरीत ग्रामस्‍थ बहिष्‍कारावर ठाम असल्‍याचे नमुद केले आहे. यामागे राजकीय षडयंञ असल्‍याचा आरोप निवेदनातुन करण्‍यात आला आहे.

Img 20250103 Wa0009

मागील काही निवडणुकांवर शिंदोला येथील ग्रामस्‍थांनी एकमताने बहिष्‍कार टाकला होता. स्‍थानिक समस्‍याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधणे हा त्‍यामागील हेतू होता. माहुर देवस्‍थानच्‍या जमिनीचा मुद्दा अतिशय महत्‍वाचा असुन पिढ्यानपिढ्या जमिनी वाहुन उपजिवीका करणाऱ्या शेतकऱ्यावर शासनदरबारी न्‍याय मिळत नसल्‍याने स्‍थानिक शेतकरी रास्‍त भुमिका बजावत होते.

मतदानाचा अधिकार हा घटनात्‍मक अधिकार असल्‍याने कोणीही मतदानापासुन वंचित राहु नये याची खबरदारी शासनाने घेणे गरजेचे आहे. मतदानाचा अधिकार लोकशाहीच्‍या विचारसरणीसाठी महत्‍वाचा आहे. खासदारांच्‍या माध्‍यमांतुन स्‍थानिक समस्‍येंचा निपटारा करण्‍यासाठी मतदान होणे गरजेचे असल्‍याचे निवेदनातुन स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

लोकशाही अबाधित रहावी याकरीता ग्रामस्‍थ मतदानात भाग घेणार असुन बहिष्‍काराला पाठींबा नसल्‍याचे निवेदनात नमुद करण्‍यात आले आहे. मतदान प्रक्रिया निर्विघ्‍न पार पडावी याकरीता प्रशासनाने काटेकोर उपाययोजना करणे गरजेचे असुन जो कोणी मतदानापासुन वंचित ठेवेल, दबावतंञाचा वापर करेल त्‍यांचेवर कायद्यान्‍वये कारवाई करावी असे निवेदनात नमुद करण्‍यात आले आहे.
Rokhthok News