Home Breaking News अनधिकृत कीटकनाशक विक्रीचा पर्दाफाश !

अनधिकृत कीटकनाशक विक्रीचा पर्दाफाश !

● कृषी व वणी पोलिसांची धडक कारवाई ● दोघे अटकेत, पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

C1 20250815 13233711

कृषी व वणी पोलिसांची धडक कारवाई
● दोघे अटकेत, पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

Big News :
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या अनधिकृत कीटकनाशकांच्या विक्रीचा वणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आदिलाबाद जिल्ह्यातील दोन इसम महाराष्ट्रात बंदी असलेली फवारणीची औषधे विक्री करत असताना रंगेहात पकडले. ही कारवाई दिनांक 13 ऑगस्टला करण्यात आली. Unauthorized pesticide sale exposed

योगेश गुणवंतराव देशमुख (44) व सचिन शंकर उरकुडे (40), दोघेही रा. बेला, जि. आदिलाबाद (तेलंगणा) अशी ताब्यातील व्यक्तींची नावे आहेत. प्रतिबंधित औषधांची खेप घेवून ते येत असल्याची गोपनीय माहिती कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) दीपक वानखेडे यांना मिळाली त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले.

कृषी विभागाचे अधिकारी रविंद्र भोजने, देवेंद्र पाचभाई, विश्वास फुलमाळी व API दत्ता पेंडकर यांच्यासह LCB पथकाने वाघदरा फाटा येथे संयुक्तपणे सापळा रचला. सायंकाळी 7 वाजता MH-29 R-3029 क्रमांकाच्या कारमधून हे इसम अनधिकृत औषधांची विक्री करताना आढळले.

Img 20250103 Wa0009

आरोपी महाराष्ट्रात बंदी असलेली औषधे विक्री करून शासन, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून अनधिकृत फवारणी औषधे 80 बॉक्स व 10 बाटल्या किंमत 2 लाख 14 हजार 190 व मारुती सुझुकी कारतीन लाख रुपये असा एकूण 5 लाख 14 हजार 190 मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 318(4) व कलम 3(5) नुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
ROKHTHOK