● मनसे सरसावली, एसडीओंना निवेदन
Wani News : रेल्वे सायडिंगवर दररोज शेकडो अवजड ट्रकच्या माध्यमातुन हजारो टन कोळसा रेल्वे रॅक मध्ये रिचवण्यात येत आहे. यामुळे धुलीकण प्रदुषण कमालीचे वाढले आहे. अनेक आजारांचा सामना स्थानिकांना करावा लागत असतांना केंद्र शासन माञ मुग गिळून गप्प आहे. आता रेल्वे सायडिंग हटविण्याकरीता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरसावली असुन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. Thousands of tonnes of coal are being loaded into railway racks by hundreds of heavy trucks on railway sidings every day.
उपविभागासोबतच शहरात प्रदुषणांचा भस्मासुर प्रचंड वाढला आहे. प्रदुषणाचे मुळ कोळशाचे दळणवळण आणि रेल्वे सायडिंग आहे. रेल्वेच्या माध्यमातुन महाजनको ला मोठया प्रमाणात कोळसा पुरविण्यात येतो. तसेच अनेक रॅक देशभरात रवाना होतात. कोळशाची साठवणुक आणि होणारे दळणवळण यामुळे शहरात प्रदुषणाने थैमान माजवले आहे.
कोळशाच्या धुळीमुळे सिलीकाडस्ट वातावरणात पसरल्या जातो. यामुळे विविध आजारांचा प्रसार मागील काही वर्षा पासुन होतांना दिसत आहे. अस्थमा, हृदयरोग, यकृताचे आजार, श्वसनाचे आजार, त्वचेचे आजार, डोळ्यांचे आजार, कॅन्सर, फुफ्फुसाचे आजार, क्षय रोग असे विविध आजाराचे रुग्ण शहरात आहेत. तसेच नपुसकत्व बळावत असल्याचे मत तज्ञ व्यक्त करतांना दिसत आहे.
यासोबतच कोळसा वाहतुकीचा आणि त्यातून होणाऱ्या प्रदूषणाचा थेट परिणाम शेतीवर व शेत पिकांवर होत आहे. यामुळे शेत जमिनीचा पोत खालावत चालला असुन उत्तपन्नात मोठी घट झाली आहे व रोगांचे प्रमाण वाढले आहे. कोळसा खदानी पासून साईडिंग पर्यंत ट्रक द्वारे कोळसा आणताना हा कोळसा रस्त्यावर पडत आहे. वाहनांच्या वाहतुकीमुळे ती धुळ रहिवाशांच्या घरात जात असल्याचे निदर्शनांस येत आहे.
मनसे नेते राजु उंबरकर यांचे मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष शिवराज पेचे आणि स्थानिक नागरीकांनी उपविभागीय अधिकारी यांना सोमवारी निवेदन दिले आहे. शहरात वाढलेल्या प्रदुषणांवर मात करण्यासाठी रेल्वे सायडिंग हटविणे गरजेचे असुन वरिष्ठ पातळीवर तातडीने पाठपुरावा करावा तसेच नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता रेल्वे सायडिंग हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
Rokhthok News






