
● आज सायंकाळी होणार अंत्यसंस्कार
Sad News :
राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आणि माजी आमदार बापूराव पानघाटे यांच्या पत्नी विमलताई बापूराव पानघाटे (वय ८५) यांचे आज दुपारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने वणी तालुक्यासह शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. Sad: Vimaltai Bapurao Panghate passes away
विमलताई पानघाटे मितभाषी, मनमिळाऊ आणि समाजकारणात सदैव सक्रिय होत्या. राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी दीर्घकाळ शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या निधनामुळे एक प्रेमळ, कर्तव्यनिष्ठ आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मोठा आप्तस्वकीय परिवार आहे. त्यांचेवर सायंकाळी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)






