Home क्राईम दिवसाढवळ्या चोरट्याने एक लाख रुपये पळवले

दिवसाढवळ्या चोरट्याने एक लाख रुपये पळवले

● दुचाकीवरील दोन अज्ञात इसम पसार

624
C1 20250527 13262437

दुचाकीवरील दोन अज्ञात इसम पसार

Crime News : शहरातील माळीपुरा परिसरात सोमवार, दिनांक 26 मे रोजी सकाळच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी दिवसाढवळ्या धाडस करत एका नागरिकाच्या दुचाकीवर ठेवलेली रोख रक्कम चोरी करून पलायन केल्याची घटना घडली. Daylight thief steals one lakh rupees

Img 20250521 wa0020

श्रीराम आनंदराव लेडांगे (56), रा. बल्लारशहा हे नेहमीप्रमाणे कामानिमित्त वणी येथे आले होते. सकाळी 11 ते 12 वाजताच्या दरम्यान माळीपुरा भागात त्यांनी आपल्या दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर एक पिशवी ठेवली होती. यात एक लाख रुपये ठेवले होते.

Img 20250103 Wa0009

दरम्यान, मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी पिशवीतील पैसे चोरी करून घटनास्थळावरून पलायन केले. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. लेडांगे यांनी थेट पोलीस ठाणे गाठले व आपबीती कथन केली. पोलिसांनी अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास PSI धीरज गुल्हाने हे करत आहेत.
ROKHTHOK NEWS