Home क्राईम शिक्षकाच्या घरात चोरी, 58 हजाराचा ऐवज लंपास

शिक्षकाच्या घरात चोरी, 58 हजाराचा ऐवज लंपास

● चोरट्यांचा उच्छाद, गस्त वाढवण्याची गरज

C1 20250803 18301700

चोरट्यांचा उच्छाद, गस्त वाढवण्याची गरज

Crime News :
शहरातील काळे लेआऊट परिसरात एका खाजगी शिक्षकाच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास चोरट्यानी घरात प्रवेश करून 58 हजार500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. Theft at teacher’s house, property worth Rs 58,000 stolen

अमित संजय पारखी (32) असे शिक्षकांचे नाव आहे ते काळे लेआऊट परिसरात वास्तव्यास आहेत. रविवारी पहाटे चोरट्यानी त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी होम थिएटर, किचनमधील देवघरातून चांदीची दोन पाते व तीन घडवलेली पान, बेडरुममधील कपाटातून सोन्याच्या दोन अंगठ्या, कानातील सहा बि-या, रोख रक्कम, दोन मनगटी घड्याळे आणि एक जुना मेकअप बॉक्स असा एकूण सुमारे 58 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या (BNS) कलम 305 (अ) व 331 (4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाणे करीत आहेत. शहरात सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलीस प्रशासनाने चोरट्यांचा मुसक्या आवळाव्यात अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
ROKHTHOK

Img 20250103 Wa0009