● वाहनावरील नियंत्रण सुटले, कार पलटी
● गणेशपूर परिसरातील घटना
Breaking News :
मारेगाव नगर पंचायतच्या प्रभाग क्रमांक 17 चे नगरसेवक जितेंद्र नगराळे हे कार अपघातात गंभीर जखमी झाले. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गणेशपूर हद्दीतील निर्गुडा नदीच्या पुलाजवळ खड्यात कार पलटी झाली. ही घटना सोमवार दिनांक 4 ऑगस्ट ला रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान घडली. Corporator seriously injured in car accident
प्राप्त माहितीनुसार, नगरसेवक नगराळे हे कायर रोडवरील एका हॉटेलमध्ये मित्राचा वाढदिवस साजरा करून स्वतःच्या इको स्पोर्ट कार क्रमांक MH-27-BE-9800 ने आपल्या गावी परतत होते. वाहन स्वतः चालवत असताना त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले व पुलाजवळील खड्यात कार दोनदा पलटी झाली. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला व छातीला मार लागल्याची माहिती आहे.
अपघात घडताच त्यांना तत्काळ वणी येथून नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. प्रकृतीबाबत डॉक्टर सतत निरीक्षण करत असून सध्या प्रकृती स्थिर आहे.
ROKHTHOK






