Home राजकीय मनसे महिला जिल्हाध्यक्ष पदी अर्चना बोदाडकर

मनसे महिला जिल्हाध्यक्ष पदी अर्चना बोदाडकर

944
राजू उंबरकर यांनी दिले नियुक्ती पत्र

वणी :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष पदी अर्चना बोदाडकर यांची राजू उंबरकर प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी नियुक्ती केली आहे.

Img 20250422 wa0027

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोमात कामाला लागल्याचे दिसत आहे. मनसेने नगर पालिकेवर सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे शहरात त्यांचे चांगलेच प्राबल्य आहे.

Img 20250103 Wa0009

स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के जागा आरक्षित आहे. त्यामुळे राजकीय पक्ष महिलांची फळी मजबूत करण्यावर भर देत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी पक्ष बांधणीला सुरवात केली आहे.

राज ठाकरे यांच्या आदेशाने अर्चना बोदाडकर यांची यवतमाळ महिला जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त केली आहे. सोमवारी झालेल्या कार्यक्रमात तृप्ती राजू उंबरकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विद्या हिवरकर महिला शहर अध्यक्ष, ज्योती मेश्राम, धनंजय त्र्यंबके, फाल्गुन गोहोकार तालुकाध्यक्ष, शिवराज पेचे शहराध्यक्ष, यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अर्चना बोदाडकर ह्या अनेक सामाजिक संघटनेशी जुळलेल्या आहे. खास करून महिलांना करिता त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहे. त्यामुळे याचा फायदा मनसेला होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

वणी : बातमीदार