* शिवसेना आक्रमक
* शिवसैनिकांची घोषणा बाजी
वणी बातमीदार:-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत अपशब्दचा वापर केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. येथील शिवाजी महाराज यांच्या पूतळ्या समोर राणे यांचा निषेध करून शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्दाचा वापर केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले आहे. शिवसैनिक चांगलेच संतापले ठीक ठिकाणी वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.
वणी येथे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर त्यांच्या नेतृत्वात राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला संतप्त शिवसैनिकांनी राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, शरद ठाकरे, संतोष माहुरे, तालुका प्रमुख संजय आवारी, चंद्रकांत घुगुल, गणपत लेडांगे, अभय सोमलकर, विक्रांत चचडा, महेश चौधरी, प्रशांत बलकी, नरेंद्र ताजने, सुनंदा गुहे, मीनल गौरकार, वनिता पिदूरकर, गुलाब आवारी, निखिल येरणे, निलेश करडभुजे सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.