● शहराचा शाश्वत विकास, भाजपचा एकच ध्यास, विद्या आत्राम यांना मिळताहेत प्रचंड जनसमर्थन
Political News
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. खंबीर नेतृत्व, शाश्वत विकासाची हमी देत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. प्रत्येक प्रभागातील मतदारात कमालीचा उत्साह दिसून येत असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम यांना प्रचंड जनसमर्थन मिळत असल्याने विरोधक हतबल तर कार्यकर्ते हताश झाले आहे. the opposition is helpless while the activists are desperate

प्रभाग 5 अ मधून सोनाली प्रशांत निमकर व प्रभाग 5 ब मधून रितिक लक्ष्मण मामिडवार तसेच प्रभाग 2 अ – रीता महेश पाहापळे. 2 ब आशिष ज्ञानेश्वर डंबारे. यांच्या प्रचारार्थ माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह भाजपा प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे, भाजपा जेष्ठ नेते महादेव खाडे सर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, भाजपा जिल्हा सचिव संतोष डंबारे, भाजपा तालुकाध्यक्ष पूर्व प्रदीप जेऊरकर,भाजपा तालुकाध्यक्ष पश्चिम मीरा पोतराजे,भाजपा वणी शहराध्यक्ष ॲड निलेश चौधरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रेयस हरणे, शहर उपाध्यक्ष विलास निमकर यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला.
नगराध्यक्ष पदाच्या विद्या आत्राम व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या भाजपच्या आक्रमक प्रचारामुळे विरोधक हतबल तर कार्यकर्ते हताश झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता नगरपालिका निवडणुकीत ‘एकतर्फी-सामना’ होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

पालिका निवडणुक निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विद्या आत्राम यांनी नगराध्यक्ष पदाच्या संपूर्ण कालावधीत जनसेवेचे व्रत अंगीकारत 24/7 कार्यरत राहण्याचे अभिवचन जनतेला दिले आहे. शाश्वत विकास आणि स्थानिकांच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
Rokhthok






