● विद्या आत्राम यांचा ग्राफ झपाट्याने वाढतोय, एकहाती सत्तेकडे भाजपची वाटचाल
Political News :
वणी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चुरशीची होत असतानाच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम यांच्या लोकप्रियतेचा ग्राफ झपाट्याने वाढताना दिसत आहे. भाजपची प्रभागनिहाय असलेली नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा, झपाटलेली कार्यकर्त्यांची फळी आणि शाश्वत विकासाने भारावलेला मतदारराजा यामुळे प्रतिस्पर्ध्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या आहेत. BJP is leading in the race for the post of Mayor!

“शाश्वत विकासासाठी भाजपचाच नगराध्यक्ष!” या घोषणेनं भाजपच्या प्रचारयंत्रणेला नवा वेग मिळाल्याचे चित्र आहे. माजी आमदार, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक पदाधिकारी प्रत्येक प्रभागात थेट जनसंपर्क साधत असून मागील कार्यकाळातील अभूतपूर्व विकास कामांचा ठसा मतदारांच्या मनावर स्पष्ट उमटल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अंतर्गत रस्ते, भूमिगत गटारे, पिण्याचे पाणी त्यातच होत असलेली अमृत 0.2 योजना, क्रीडा संकुलाचे काम, बाग-बगीचे यामुळे नागरिकांचा भाजपवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे जाणवत आहे.

भाजपची पुन्हा एकहाती सत्तेकडे वाटचाल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोरदारपणे व्यक्त केली जात आहे. युवा वर्गापासून महिला मतदारांपर्यंत सर्व स्तरांतून मिळत असलेला अपेक्षित प्रतिसाद पाहता नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपने आघाडी घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे.
शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा जोर आणखी वाढणार असल्याने ही लढत अधिक तापण्याची चिन्हे आहेत. मात्र आत्तापर्यंतचे चित्र भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम यांच्याच बाजूने झुकलेले दिसत आहे.
Rokhthok






