Home राजकीय शेख ताविस यांची सचिवपदी नियुक्ती

शेख ताविस यांची सचिवपदी नियुक्ती

● संघटनात्मक बांधणीसाठी राष्ट्रवादी सरसावली

296
C1 20231229 16033008
संघटनात्मक बांधणीसाठी राष्ट्रवादी सरसावली

Wani News : राज्यात निवडणुकांचे वारे वाहत आहे, सर्वच राजकीय पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी सरसावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार ) गटाने सर्वच स्तरावर तरुणांना स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. येथील शेख ताविस शेख राजू यांची वणी शहर युवा सचिव पदी नियुक्ती केली आहे. Sheikh Tawis Sheikh Raju has been appointed as Wani City Youth Secretary.

Img 20250422 wa0027

तरुणांना मुख्य प्रवाहात ओढून पक्षीय संघटनात्मक बांधणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गट करताहेत. तरुण तडफदार युवकांना पक्षात पदे देण्यात येत आहे. नुकतीच जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल अजीज सिद्दीकी यांनी शेख ताविस यांना नियुक्ती पत्र देत पक्षीय जबाबदारी सोपवली आहे.

Img 20250103 Wa0009

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वणी शहर युवा सचिव पदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अजीतदादा पवार यांच्या विचारानूसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या विकासात भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा नियुक्ती पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
Rokhthok News