Home राजकीय माजी सदस्यांना भाजपने दाखवला “ठेंगा”

माजी सदस्यांना भाजपने दाखवला “ठेंगा”

● इलेक्टिव्ह मेरिट उमेदवारांना संधी ● निवड प्रक्रियेवर माजी आमदारांचा वरचष्मा

C1 20251118

इलेक्टिव्ह मेरिट उमेदवारांना संधी
निवड प्रक्रियेवर माजी आमदारांचा वरचष्मा

Political News :
विधानसभेतील पराभवानंतर भाजपने सावध पवित्रा घेत काही अपवाद वगळता बहुतांश माजी सदस्यांना “ठेंगा” दाखवत इलेक्टिव्ह मेरिट उमेदवारांना संधी दिली आहे. या निवड प्रक्रियेत माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा वरचष्मा दिसून येत आहे. BJP showed former members “thenga”

सध्यस्थीतीत महाराष्ट्र व बिहार विधानसभेत ज्याप्रमाणे भाजपची त्सुनामी आली आहे त्याप्रमाणेच मागीलवेळी पालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. 26 पैकी तब्बल 22 नगरसेवक निवडून आले होते तर अन्य राजकीय पक्षाला खाते ही उघडता आले नव्हते. यावेळी भाजपा समोर शिवसेना (उबाठा) व काँग्रेस आघाडी आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.

नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. पालिकेत तिरंगी लढत होणार असून महायुतीत बिघाडी तर मविआत समन्वयाचा अभाव दिसत आहे. नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिलेकरिता आरक्षित असल्याने सर्व प्रमुख पक्षांमध्ये तगडी स्पर्धा निर्माण होणार असल्याचे भाकीत सध्याच करणे अतिशोक्ति ठरणार आहे.

Img 20250103 Wa0009

नगराध्यक्ष पदासाठी 10 उमेदवारांनी नामांकन दाखल केले असून अंतिम टप्प्यापर्यंत चुरस कायम राहण्याची दाट शक्यता आहे. तर नगरसेवक पदासाठी शेवटच्या दिवशीपर्यंत दाखल झालेल्या फॉर्मांची संख्या तब्बल 192 वर पोहोचली आहे. या विक्रमी नामांकनांमुळे पालिका निवडणुकीत अपक्षांचा बोलबाला राहणार आहे.

नामांकनांची मोठी संख्या पाहता मतदानाच्या दिवशीही तितकीच तुफानी स्पर्धा अपेक्षित आहे. अटीतटीच्या लढती, सूक्ष्म जातीय समीकरणे, संघटनशक्ती आणि स्थानिक जनसमर्थन यावरच या निवडणुकीचे गणित ठरणार आहे. एकूणच, राजकीय आरोप-प्रत्यारोप, घराघरातील संपर्क दौरे, रस्त्यांवरचा प्रचार आणि मतदारांना आकर्षित करण्याची चुरस अशा सगळ्यांमुळे पालिकेचा हा निवडणूक रणसंग्राम भरपूर रंगत, थरार आणि राजकीय अनिश्चिततेने भरलेला ठरणार यात शंका नाही.
ROKHTHOK