Home राजकीय भाजपचा झंझावात, जिल्हाध्यक्षांनी दिला विजयाचा ‘कानमंत्र’ !

भाजपचा झंझावात, जिल्हाध्यक्षांनी दिला विजयाचा ‘कानमंत्र’ !

● पालिका निवडणुकीत नियोजनबद्ध रणनीती ● बूथ लेव्हल पर्यंत कार्यकर्ते सक्रिय

C1 20251119

पालिका निवडणुकीत नियोजनबद्ध रणनीती
बूथ लेव्हल पर्यंत कार्यकर्ते सक्रिय

Political News :
वणी नगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राजकीय वातावरणात अक्षरशः झंझावात निर्माण केला आहे. प्रचारयंत्रणा ‘ऑन मोड’वर येताच प्रभागनिहाय कॉर्नर सभा, घर-घर संपर्क मोहीम आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती यामुळे निवडणूक तापू लागली आहे. प्रत्येक सभेत उमेदवार व कार्यकर्त्यांत नवा उत्साह ओतला जात असून भाजपची संघटना बूथ लेव्हलपर्यंत पूर्ण क्षमतेने सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. BJP storm, district president gives ‘early warning’ of victory

बुधवारी जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल्ल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या पदाधिकारी व उमेदवारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत विजयश्री खेचून आणण्यासाठीची ‘अंतिम रणनिती’ ठरविण्यात आली. यावेळी चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना व उमेदवारांना संघटित प्रयत्न, नियोजनबद्ध हालचाल आणि बूथ व्यवस्थापन याबाबत महत्त्वाचा थेट “कानमंत्र” दिला.

निवडणूक प्रचारात माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार तसेच दिनकर पावडे, रवी बेलूरकर, संजय पिंपळशेंडे, अंकुश बोढे, ऍड. निलेश चौधरी यांसह अनेक आघाडीचे पदाधिकारी झपाटल्यासारखे कार्यरत आहेत. प्रभागनिहाय मिटिंग्स, सोशल मीडिया मोहीम आणि बूथ वॉर रूम्समुळे संपूर्ण शहरात भाजपचा प्रचार वेग घेत आहे.

Img 20250103 Wa0009

पालिका निवडणुकीच्या रणांगणात भाजपने अशा गतीने प्रवेश केल्याने आगामी दिवसांत वातावरण आणखी तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. पालिका निवडणुकीत तिरंगी लढती होईल असे आजचे चित्र आहे. नगराध्यक्ष पदाकरिता भाजपने विद्या खेमराज आत्राम या उमेदवारांची निवड करून विरोधकासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.
ROKHTHOK