● मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करून भ्रष्टाचाराचा कळस गाठला….
YAVATMAL NEWS
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सामान्य जनतेचे प्रश्न जैसे थे असताना महायुती सरकारच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करून भ्रष्टाचाराचा कळस गाठला असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. अशा कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी हीच जनभावना असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभर जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. Public outrage movement across the state on the orders of party chief Uddhav Thackeray
सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजता तिरंगा चौक यवतमाळ येथे हे आंदोलन होणार असून खासदार संजय देशमुख व आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडेल. या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तथा कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढत असताना, पीककर्ज माफी केवळ आश्वासनांपुरतीच राहिली आहे. पीक विम्यापासून शेतकरी वंचित आहेत तर लाडक्या बहिणींना आता पैसे कमी करून देण्यात येत असून लाखो बहिणींना यातून वगळण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान, कृषिमंत्री आणि अन्य मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरही सत्ताधाऱ्यांनी पाठीशी घालण्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शेतकरी, सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांच्या आवाजाला न्याय देण्यासाठी हे आंदोलन निर्णायक ठरेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
Rokhthok