● आपुलकीचे नाते हे त्यांच्या नेतृत्वगुणांचे प्रतिक
Wani News :
वणी शहरातील उद्योगजगत, सामाजिक क्षेत्र आणि संघटनात्मक नेतृत्व या तिन्ही आघाड्यांवर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे सुभाष बिलोरीया. विद्युत उपकरण या व्यवसायातून त्यांनी व्यावसायिक प्रामाणिकतेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या व्यवसायाचे जाळे जिल्ह्याबाहेरही विस्तारले आहे. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी व्यवसायासोबत समाजसेवेचा तोलही उत्तम राखला आहे. Subhash Biloria: New leadership shines in the municipal elections!
छत्रपती शिवाजी महाराज मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष म्हणून सुभाष बिलोरीया यांनी ग्रुपला नवा आयाम दिला आहे. संघटन कौशल्य, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे मॉर्निंग ग्रुप आज वणीतील सर्वात सक्रिय व प्रभावी मॉर्निंग ग्रुप ठरला आहे. अलीकडेच त्यांच्या संकल्पनेतून झालेली जगन्नाथ पुरी यात्रा ही केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक ऐक्याचा उत्कृष्ट नमुना ठरली आहे. या प्रवासातील नियोजन कौशल्य, आनंदी वातावरण आणि प्रत्येक सदस्याशी असलेले आपुलकीचे नाते हे त्यांच्या नेतृत्वगुणांचे प्रतिक आहे.
वणी नगर परिषदेच्या निवडणुकीत सुभाष बिलोरीया यांचे नाव त्यांच्या प्रभागातून चर्चेत आहे. “व्यवसायात यश आणि समाजासाठी कार्य” ही दुहेरी ओळख त्यांना नागरिकांच्या नजरेत विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व म्हणून उभे करतांना दिसत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वणी शहरात विकासाचा नवा अध्याय लिहिला जाऊ शकतो, अशी भावना मतदार व्यक्त करत आहे. मित्रमंडळी, व्यावसायिक वर्ग आणि तरुणाईत त्यांच्या नावाबद्दल प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
सुभाष बिलोरीया यांनी नेहमीच समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्यावर भर दिला आहे. मागील तीस वर्षांपासून ते शहरात गुरू पौर्णिमे निमित्त स्वखर्चाने कार्यक्रम आयोजित करत आहे. त्यांची सांघिक विचारधारेशी नाळ जुळली आहे. शहराच्या प्रगतीसाठी नियोजनबद्ध दृष्टी, पारदर्शक प्रशासन आणि नव्या कल्पनांची अंमलबजावणी, हे त्यांचे आगामी ध्येय आहे. म्हणूनच नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाव्य उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advt.
Rokhthok






