Home राजकीय विकसित वणीचे व्हिजन केवळ भाजपकडेच.!

विकसित वणीचे व्हिजन केवळ भाजपकडेच.!

● विकासाची गाडी भाजपची, ड्रायव्हर विद्या आत्राम, निधी खेचून आणणार माजी आमदार बोदकुरवार, महसूलमंत्री बावनकुळे यांची ग्वाही.....

C1 20251129

विकासाची गाडी भाजपची, ड्रायव्हर विद्या आत्राम, निधी खेचून आणणार माजी आमदार बोदकुरवार, महसूलमंत्री बावनकुळे यांची ग्वाही…..

Political News : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे शनिवारी काढलेल्या विराट रॅलीने संपूर्ण शहर दणाणून गेले. प्रचंड जनसागराच्या साक्षीने झालेल्या जाहीर सभेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वणी शहराच्या विकासासाठी ‘धडाकेबाज’ घोषणा करत विरोधकांवर सडकून टीका केली. The vision of a developed country lies only with BJP!

FB IMG

सभेच्या प्रारंभी आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणीतील विकासकामांचा आढावा घेत भाजपची विकासनिष्ठ भूमिका अधोरेखित केली. यानंतर आपल्या दमदार भाषणातून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केली.

FB IMG

विकास, पारदर्शकता आणि सुशासन हेच भाजपचे मुख्य आधारस्तंभ आहेत. देशाच्या विकासाचा रथ केंद्रातील मोदी सरकार यांच्या नेतृत्वात अविरत पुढे जात आहे. वणी विकास आराखडा तयार आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे स्पष्ट व सर्वसमावेशक व्हिजन फक्त भाजपाकडेच आहे. असे प्रतिपादन आयोजित प्रचार सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Img 20250103 Wa0009

विरोधक वर्षानुवर्षे विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करताहेत. कामापेक्षा केवळ पोकळ घोषणा करताहेत. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने तब्बल 124 योजनांचा लाभ तथा मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता होणार आहे. याकरिता नगराध्यक्ष विद्या आत्राम व सर्व नगरसेवक विजयी होणे हे विकसित शहराकरिता गरजेचे असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

C1 20251129

मागील कार्यकाळात पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता होती, सुवर्णाक्षरांनी लिहावा असा विकास झाला आहे. विकास हा आमच्या अजेंड्याचा केंद्रबिंदू आहे. वणीला पुढील पाच वर्षांत बदललेले शहर पाहायचे असेल, तर पुन्हा भाजपला संधी द्यावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. नगराध्यक्ष पदाची उमेदवार विद्या आत्राम व सर्व भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या भव्य सभेला माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, रवी बेलूरकर, संजय पिंपळशेंडे, महादेव खाडे, अंकुश बोढे, ऍड. निलेश चौधरी, गजानन विधाते, संतोष डंभारे, श्रीकांत पोटदुखे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rokhthok