वणी:– तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्याम धनमने यांची प्रशासकीय कारणावरून देऊळगाव राजा येथे बदली करण्यात आली आहे.

धनमने हे ऑक्टोबर 2018 ला वणी तहसीलदार पदी रुजू झाले होते. त्यांनी 3 वर्षांचा कार्यकाळ वणी येथे पूर्ण केला आहे. कोरोना काळात ते आपत्ती व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष होते. त्या दरम्यान त्यांनी उत्तम कामगिरी पार पाडली. शनिवारी त्यांची प्रशासकीय कारणावरून बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी कोण येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.