● बॅगलेस उपक्रम या सत्रापासून
वणीः विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात निसंकोचपणे शाळेत वावरता यावं याकरीता या सत्राच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले. भारतीय संस्कृतीचा वारसा जपत स्वागत करण्यात आल्याने विद्यार्थ्यांत चैतन्य निर्माण झाले होते. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना मॅडम प्रामुख्याने उपस्थित होत्या.

सोमवार दि. 27 जूनला शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी फुलून गेला होता. कोरोनाकाळात बंद असलेल्या शाळा पूर्ववत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा बघायला मिळाल्या. शाळा व्यवस्थापनाने शाळेचा परिसर, क्लास रूम, फुगे व अन्य सजावटी वस्तू लावून सजवला होता.
मॅकरून इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका शोभना मॅडम, शिक्षिका मोनाली राजूरकर, रुपाली घाटे यांचेसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील विद्यार्थ्यांचे उत्स्फुर्तपणे स्वागत केले. याप्रसंगी पालक वर्ग सुद्धा उपस्थित होता.
वणीः बातमीदार