Home वणी परिसर वणीकरांनी चाखला रानभाज्यांचा “स्वाद”

वणीकरांनी चाखला रानभाज्यांचा “स्वाद”

174

* जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य

* कृषी विभाग व आत्माचा स्तुत्य उपक्रम

वणी बातमीदार: येथील बि.आर.जी.एफ.सभागृहात कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचे वतीने जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सव विक्री व प्रदर्शनाचे आयोजन बुधवार दि.12 ऑगस्ट ला करण्यात आले होते.

Img 20250422 wa0027

रानभाजी महोत्सवाचे उदघाटक आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रमुख पाहुणे म्हणून प. स. सभापती संजय पिंपळशेंडे, जि.प. सदस्या मंगला पावडे, बंडू चांदेकर, संघदीप भगत, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार विवेक पांडे, गट विकास अधिकारी राजेश गायनर प्रामुख्याने उपस्थित होते. येथे पार पडलेल्या रानभाजी महोत्सवात उपस्थितांनी कोविड त्रिसूत्रीचे पालन करत सहभाग नोंदविला होता. महोत्सवात केसुर्ली, घोन्सा, मजरा, ढाकोरी, निळापूर, शेलु (खु), मंदर, कोरम्बी, रासा, उमरी, बाबापूर, गणेशपूर, वणी येथील शेतकरी व उमेद प्रकल्पातील महिला बचत गटांच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

Img 20250103 Wa0009

महोत्सवामध्ये कर्टोली, शेवगा फुले, रान तोंडारे, बांबू कोंब, भुईनिंब, अळू, गोपीन, कुंजीर, तरोटा, केणा, घानभाजी, आघाडा, कोंबडा, वाघाटी, अंबाडी, गोपा, राजगिरा, मोठा माठ, कपाळफोळी, घोड, फासवेल, पाथरी, कवठ, चिवड, काठेमाट, गुळवेल, खासभाजी, उंबर, कुळ्याची शेंग, चिंचवट इत्यादी रानभाज्या व रानफळांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते व त्याची विक्री सुद्धा महोत्सवामध्ये करण्यात आली होती.

रानभाजी महोत्सवाच्या यशस्वितेकरिता उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा जगन राठोड यांच्या मार्गदर्शनामध्ये तालुका कृषी अधिकारी सुशांत माने, आनंद बदखल, पवन कावरे, समिक्षा वानखडे, धम्मपाल बन्सोड, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व शेतकरी मित्रांनी अथक परिश्रम घेतले.