Home वणी परिसर शिवराज पेचे मनसेचे नवे शहराध्यक्ष

शिवराज पेचे मनसेचे नवे शहराध्यक्ष

836

राजू उंबरकर यांनी केली नियुक्ती

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहे.त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे. यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मागे नाही शहरात संघटन बांधणी साठी शिवराज पेचे यांची शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

Img 20250422 wa0027

वणी नगर पालिकेची निवडणूक आता जवळ येत आहे.त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहे.एक हाती सत्ता असलेल्या भाजपाला कसे रोखता येईल  या करिता रणनीती तयार करतांना दिसत आहे.

Img 20250103 Wa0009

मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी या पूर्वी नगर पालिकेवर मनसेचा झेंडा फडकविला होता त्याच बरोबर सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले होते.मात्र मागील निवडणुकीत अपक्ष वगळता कोणत्याही राजकीय पक्षाला खाते उघडता आले नाही.

अवघ्या काही महिन्यांवर असलेल्या पालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरण्याचा इरादा सर्वच राजकीय पक्षांनी केल्याचा दिसून येत आहे.शहरातील युवकांचा कल नेहमीच मनसे कडे राहिला आहे.त्यामुळे शहरातील संघटन वाढीसाठी शिवराज पेचे या युवकाच्या खांद्यावर शहराध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली आहे.

राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी पेचे यांना नियुक्ती पत्र दिले असून शिवराज पेचे यांच्या रुपाने एक युवा चेहरा  मनसेला मिळाला आहे.यावेळी धनंजय त्रिम्बके,अजिद शेख,अस्लम सलाट सह कार्यकर्ते उपस्थित होते.

वणी : बातमीदार