वणी:- येथील लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल ची विध्यार्थीनीं स्वामींनी प्रशांत कुचनकार हिला शिक्षकदीना निमित्ताने गडचिरोली पोलिसांनी एका दिवसाकरिता डी.आय.जी.होण्याचा मान दिला आहे.

स्वामींनी ही येथील लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल ची विध्यार्थीनीं आहे.लहान पणा पासूनच ती प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने प्रयत्न करीत आहे.ती उत्कृष्ठ भाषण देखील करीत असून नुकतीच तिने माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रगट मुलाखत घेतली होती.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून गडचिरोली विशेष पोलीस महानिरीक्षक (नागपूर कॅम्प) चे IPS अधिकारी संदीप पाटील यांनी स्वामींनी ला एक दिवसाची डि.आय.जी.बनविले.यावेळी तिला गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागात कश्या अडचणी असतात. व नक्षलवाद म्हणजे काय ? व भविष्यात नागरीसेवेत येण्यासाठी पहिल्या वर्गापासूनच पहिल्या पाच नंबर मध्ये येण्याची जिद्द निर्माण असायला हवी असे मार्गदर्शन आय पी एस अधिकारी संदीप पाटील यांनी केले. या करिता स्वामींनी ला मुख्याध्यापक प्रशांत गोडे व शिक्षिका मनीषा ठाकरे चे मार्गदर्शन लाभले.