● लहान सहान अपघाताची मालीका सुरू
● शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन
Wani News | वणी शहरातील बहुतांश अंतर्गत मार्गाची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांमुळे लहानसहान अपघाताची मालीका सातत्याने सुरू आहे. निष्पाप जिवाचा बळी गेल्यावर रस्ता बांधणीचा मुहूर्त काढणार आहात का ? असा सडेतोड सवाल युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी निवेदनातुन उपस्थीत केला आहे. Are you going to schedule road construction after innocent lives have been lost

शहरातील अतिशय वर्दळीचा असलेला टिळक चौक ते दिपक चौपाटी हा मार्ग पूर्णतः खड्डयांनी व्यापलेला आहे. ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो आहे.
पावसाळयाचे दिवस सुरू झाल्यामुळे रस्त्यावरील खड्डयाचा अंदाज येत नसल्याने अपघाताची मालीकाच सुरू झाली आहे. मागील दिड वर्षांपासुन नागरीकांनी रस्ता दुरूस्तीबाबत पालीका प्रशासनाला तक्रारी, निवेदने केल्यानंतरही पालीका प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
● निष्पाप जिवांचा बळी गेल्यावर बांधणार का रस्ता ●
शहरातील अनेक महत्वपर्ण रस्त्यांची स्थिती पूर्णतः डबघाईस आली आहे. रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी निधीची मंजुरात मिळाल्याचा काही महीन्यापुर्वी आमदारांनी दावा केला होता. परंतु खऱ्या अर्थाने अद्याप कामाला सुरवात झालेली नाही. यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे बांधकाम तातडीने करावे, अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
अंजिक्य शेंडे
उपजिल्हा प्रमुख, युवा सेना