Home वणी परिसर महिलांसाठी उद्योजक्ता व रक्तदान शिबिर

महिलांसाठी उद्योजक्ता व रक्तदान शिबिर

● संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

C1 20250522 17514468

संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

Wani News : वणी विधानसभा क्षेत्रातील धडाडीचे नेते, समाजकारणी, कामगार नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, 23 मे रोजी वणी येथील शेतकरी मंदिर परिसरातील वसंत जिनिंग हॉलमध्ये महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण शिबिर तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. Entrepreneurship and blood donation camp for women

सकाळी 11 वाजता महिलांसाठी आयोजित उद्योजकता प्रशिक्षण शिबिरात बचत गटांच्या सदस्यांसह गृहउद्योग करणाऱ्या महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती, कर्जवाटपाच्या योजना व रोजगाराच्या संधी याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात पांढरकवडा येथील उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ गणेश आत्राम यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

प्रशिक्षण शिबिरानंतर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, दोन्ही उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा यासाठी संजय खाडे फाउंडेशनतर्फे आवाहन करण्यात आले आहे. समाजकार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श संजय खाडे यांनी घालून दिला आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009