Home Breaking News निशुल्क रोग निदान शिबीर आणि सामाजिक उपक्रमाची लयलूट

निशुल्क रोग निदान शिबीर आणि सामाजिक उपक्रमाची लयलूट

332
C1 20240404 14205351

निमित्य विजय चोरडिया यांच्या वाढदिवसाचे

वणी | भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा प्रसिध्द व्यावसायिक विजय चोरडिया यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. शुक्रवार दि. 2 ते 4 सप्टेंबर पर्यंत विविध सामाजिक संघटने कडून सामाजिक उपक्रमाची लयलूट आणि निशुल्क रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

विजय चोरडिया हे येथील प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी आहे. तसेच ते राजकीय सोबतच विविध सामाजिक संघटनेशी जुळलेले आहे. त्यांचा 4 सप्टेंबर ला वाढदिवस आहे. त्या निमित्याने तीन दिवस विविध सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे.

दि 2 सप्टेंबर ला श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती द्वारा सायंकाळी 6 वाजता ‘रेयांश म्युझिकल ग्रुप नागपूर’ यांचा सुमधुर गीतांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. तर रात्री 9 वाजता श्री गणेशाच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री 7 वाजता इनरव्हील क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी च्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीन चे वाटप करण्यात येणार आहे.

दि 3 सप्टेंबर ला प्रभू राम जन्मोत्सव समितीच्या वतीने कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम व लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर यांच्या सहकार्याने सकाळी 10 वाजता नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीर व निशुल्क रोग निदान शिबीर घेण्यात येणार आहे.

यावेळी शिबिरात हृदयरोग, स्त्रीरोग, बालरोग, सर्जरी, अस्थीरोग, नाक-कान-घसा, नेत्र रोग, चर्मरोग व इतर आजारावर तज्ञ डॉक्टरां कडून उपचार करून औषध व श्रवणयंत्र निशुल्क दिल्या जाणार आहे.

दि 4 सप्टेंबर ला सकाळी 7 वाजता शिवाजी चौकात मॅराथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महिलां करिता 3 किमी तर पुरुषा करिता 5 किमी दौड घेण्यात येणार आहे. संस्कार भारती समितीच्या वतीने शहरातील मुख्य चौकात भव्य रांगोळी स्पर्धा होणार आहे.

सकाळी 11 वाजता स्माईल फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. तर दुपारी 4 वाजता नगर सेवा समिती च्या पुढाकाराने शहरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सायं 5 वाजता विजय चोरडिया परिवारा तर्फे बालसदन येथील मुलांना कपडे वाटप करण्यात येणार आहे.

आरोग्य शिबिर साठी पियूष चव्हाण – 9518753059, शुभम डोंगे -9637343337, राजू रिंगोले – 9284881655, सागर जाधव – 7038204209 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार
Previous articleपाटाळा पुलावर घेतला युवकाने ‘गळफास’
Next articleबहिणीकडे आला आणि गळफास घेतला
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.