Home Breaking News युवा शेतकऱ्याची आत्महत्या

युवा शेतकऱ्याची आत्महत्या

831

कोलार पिंपरी येथील घटना

रोखठोक:- तालुक्यातील कोलार पिंपरी येथील 21 वर्षीय युवा शेतकऱ्याने गावालगत असलेल्या गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही बाब मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

अनिरुद्ध बोंडे 21) असे युवा शेतकऱ्यांचे नाव आहे. तो शहरापासून जवळच असलेल्या कोलार पिंपरी येथील रहिवासी होता. शेती सोबतच तो दुधाचा व्यवसाय करीत होता. दि 31 ऑक्टोबर ला रात्री च्या सुमारास गावा लगत असलेल्या गुरांच्या गोठ्यात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Img 20250103 Wa0009
C1 20250418 20491706

सकाळी ही घटना उजेडात आली. या बाबत वणी पोलिसाना माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही पुढील तपास डोमाजी भादिकर करीत आहे.