Home वणी परिसर हर्षा, राधीका व साहिल…  JEE Advance साठी पात्र

हर्षा, राधीका व साहिल…  JEE Advance साठी पात्र

● स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी

1308

स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी

रोखठोक | येथील स्‍वर्णलीला इंटरनॅशनल स्‍कुल मधील विद्यार्थ्यांनी JEE (Main) परीक्षेत विविध प्रवर्गातून यश संपादन केले असुन JEE  Advance साठी पात्र ठरले आहेत. Students of Swarnalila International School achieved success in various categories in JEE (Main) examination.

स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी हर्षा उईके, राधिका ठाकरे आणि साहिल पावडे यांनी विविध प्रवर्गातून यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये त्यांचे स्वतःचे व शिक्षकवृंदाचे अथक परिश्रम कारणीभूत ठरले आहेत.

Img 20250103 Wa0009
C1 20250418 20491706

स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल ही अल्फोर्स ग्रुप ऑफ स्कूल, तेलंगणा आणि महाराष्ट्र च्या व्यवस्थापनाअंतर्गत कार्यरत आहे. या ग्रुपचे संचालक डॉ.व्ही. नरेंद्र रेड्डी व स्कूलच्या प्राचार्या डॉ. सौजन्या यांचे वेळोवेळी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्‍यानेच विद्यार्थी यशोशिखरावर पोहचतांना दिसत आहे.
वणी: बातमीदार