Home वणी परिसर MNS WANI: संघटनात्मक बांधणीचा “धडाका”

MNS WANI: संघटनात्मक बांधणीचा “धडाका”

● गाव तिथे शाखा, शेकडो तरुण मनसेत

819

गाव तिथे शाखा, शेकडो तरुण मनसेत

Raju Umabarkar News: वणी विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटनात्मक बांधणीचा धडाकाच लावला आहे. शेकडो तरुण पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसेत दाखल होत आहेत. मनसे नेते राजू उंबरकर यांना मिळत असलेला जनाधार बघून विरोधकांना निश्चितच धडकी भरली असेल. Hundreds of young people are joining the MNS inspired by the thoughts of party chief Raj Thackeray.

वणी तालुक्यातील कुर्ली व येनाडी येथील शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी मनसे नेते राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत रीतसर प्रवेश केला. तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिकांशी संवाद साधत शाखेचे उद्घाटन केले.

Img 20250103 Wa0009
C1 20250418 20491706

भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संपूर्ण मतदारसंघात संघटनात्मक बांधणीकडे लक्ष केंद्रित केले आहे. जनहितार्थ, सामाजिक, विकासाभिमुख आणि रंजल्या गांजलेल्यांच्या न्याय हक्कासाठी सदोदित तत्पर असणारा नेता म्हणून उंबरकर यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे.

“जिथे उंबरकर तिथे जनसागर” हे वणीकरांनी अनेकदा अनुभवले आहे. मतदारसंघात मनसेचा वाढणारा प्रभाव अनेक राजकीय पुढाऱ्यांना खटकणारा आहे. कारण 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक फेऱ्यात मनसेने घेतलेली आघाडी हीच बाब आता सत्यात तर उतरणार नाहीना ही चिंता विरोधकांना सतावत आहे.

याप्रसंगी फाल्गुन गोहोकार, धीरज पिदुरकर, विलन बोदाडकर, गितेश वैद्य, महेश कुचनकर, रणजित बोंडे, भरत चटप, मारोती बोटपेले, गजानन ठाकरे, राजु काळे, अनंता डाखरे, विनोद कउचनकर, मोरेश्वर ननकटे, साई उघे, संतोष बुच्चे, गजानन उघे, प्रविण मोहजे व अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Rokhthok News