Home वणी परिसर आणि… तो रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

आणि… तो रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

● अर्धवट बांधकाम, PWD चे दुर्लक्ष

1226
C1 20240312 13162300

अर्धवट बांधकाम, PWD चे दुर्लक्ष

Wani News | आबई फाटा – कुरई – बोरी – कोरपना राज्य महामार्ग वरील आबई फाटा ते कुरई टप्प्यातील संपूर्ण डांबरीकरण करण्यात आले. परंतु कुरई ते पैनगंगा नदी ( जिल्हा सीमा )पर्यंतचा रस्ता खडीकरण होऊन अद्यापही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे हा रस्ता केव्हा होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. The question is being raised as to when this road will be built.

मागील दोन दशकांपासून या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली होती. अलीकडेच निधीची तरतूद करून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु कुरई ते पैनगंगा नदी पर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण होऊन ही डांबरीकरणाला विलंब होत आहे. परिणामी रस्त्यावरचे खडीकरण ही अल्पावधीतच उखडले जात आहे.

रस्त्याचे गूळ गुळीत होण्याचे स्वप्न, दिवास्वप्नच ठरणार की काय ? असा सवाल वाहतूकदाराकडून उपस्थित होतो आहे. या अनुषंगाने सदर रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच मार्गावरीलल चंद्रपूर जिल्ह्यातील पैनगंगा नदी पुल ते तुकडोजी नगर पर्यंतच्या रस्त्याचे ही अलीकडेच डागडुजीचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे या मार्गाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या दृष्टीने बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

त्या रस्त्याची व्हावी डागडूजी
वणी ते कोरपना रस्त्यावरील खादला ते वेळाबाई फाटा , पैनगंगा नदी पुल ते बोरी दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. याची ही डागडुजी होणे अपेक्षित आहे. तसेच या मार्गावर दिशादर्शक व अंतर फलक ही लावणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय महामार्ग दर्जा कधी मिळणार
वणी ते कोरपना मार्गाला राष्ट्रीय महामार्ग दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी आहे. या अनुषंगाने अनेक लोकप्रतिनिधी व संबंधित विभाग यांना नागरिकांनी निवेदने दिली. मात्र यावर आज पर्यंत कुठलेही पाऊल उचलण्यात आली नाही.सदर मार्ग झाल्यास दोन्ही जिल्ह्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
Rokhthok News