Home वणी परिसर बैलगाडा शर्यत, महीला धुरकऱ्यांनी गाजवले मैदान

बैलगाडा शर्यत, महीला धुरकऱ्यांनी गाजवले मैदान

● लाखो रूपयांच्‍या बक्षिसांची लयलुट

1028
C1 20240224 19534422
C1 20240404 14205351

लाखो रूपयांच्‍या बक्षिसांची लयलुट

Wani News : दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विदर्भ केसरी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. लाखो रुपयांच्या बक्षिसाची लयलूट करण्यात आली तर महीला धुरकऱ्यांनी मैदान गाजवले. तब्बल 26 वर्षानंतर आयोजित बैलगाडा शर्यतीने प्रेक्षकांच्‍या डोळयांचे पारणे फेडले. Vidarbha Kesari Shankarpata was organized in memory of late MP Balu Dhanorkar.

वणीतील जत्रा मैदान येथे दि. तिन दिवसीय विदर्भ केसरी शंकरपटाचे आयोजन कापुस उत्‍पादक पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी केले होते. माजी आमदार वामनराव कासावार यांनी मंगळवारी शंकरपटाचे उदघाटन केले. यावेळी अध्‍यक्षस्‍थानी हिंगघाटचे माजी आमदार राजु तिमांडे उपस्‍थीत होते. तसेच वरोरा- भद्रावती च्‍या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विदर्भ केसरी शंकरपटात उपस्थिती लावून स्वतः धुरकऱ्यांची भूमिका वठवली.

C1 20240225 07564731

विदर्भ केसरी शंकरपटात महीला धुरकऱ्यांनी सहभाग घेत चांगलेच मैदान गाजवले.धामनगाव येथील अठरा वर्षीय श्रुती वाळके हिने आपली बैलजोडी 6. 68 सेंकदात आणुन बक्षिस पटकाविले. गणेशपुर येथील राधा बोबडे हिने 8.33 सेंकदात आपली बैलजोडी हाकून बक्षिसाची मानकरी ठरली. राजुर इजारा येथील भाविका मिलमिले या तरूणीने शर्यतीत रंगत आणुन प्रेक्षकांची दाद मिळवली.

विदर्भ केसरी शंकरपटाचे आयोजक पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी जवळपास पाचशे जनांचा सत्‍कार केला. वणी विधानसभा क्षेत्रातील सरपंच,  संस्‍थांचे पदाधिकारी, प्रतिष्‍ठीत शेतकरी, पत्रकार व विवीध राजकीय पुढाऱ्यांच्या सृतीचिन्‍ह देउन सत्‍कार करण्‍यात आला. शंकरपट पाहण्‍यासाठी आलेल्‍या काही महीलांचा देखील खाडे यांनी सत्‍कार केला.

शंकरपटाच्‍या पहील्‍या दिवशी तालुक्‍यातील 30 बैलजोडयांनी सहभाग नोंदवला होता. रांगणा येथील गुणवंत वांढरे यांच्‍या तेजा व वायकर या बैलजोडीने गावगाडा गटातुन पथम बक्षिस पटकावले. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी अ व क या दोन्‍ही गटातुन दोनशेपेक्षा अधिक बैलजोडया मैदानात उतरल्‍यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.

संभाजीनगर जिल्‍हयातील कढोली येथील मनोहर चव्‍हाण यांच्‍या लखन व जलवा या बैलजोडीने  6.54 सेंकदात अंतर कापुर अ गटात प्रथम क्रमांक मिळवला. हिवरा संगम येथील साहेबराव पाटील यांच्‍या लक्षा व राणा या जोडीने 6. 59 सेंकदात अंतर कापुन व्दितीय क्रमांक पटकावला. तर क गटात दहीसावळी (महागाव) येथील पवार यांच्या जोडीने 6. 79 सेंकदात अंतर कापुन प्रथम क्रमांक मिळवला. जालणा जिल्‍हयातील वडगाव येथील नवनाथ महाराज यांच्‍या बैलजोडीने 6.88 सेंकदात अंतर कापुन व्दितीय क्रमांक मिळवला.
Rokhthok News