Home Breaking News अज्ञात वाहनांची दुचाकीला धडक, युवक गंभीर

अज्ञात वाहनांची दुचाकीला धडक, युवक गंभीर

● राजूर फाट्याजवळील घटना

1624
C1 20240404 14205351

राजूर फाट्याजवळील घटना

Accident News Wani :- अपघात प्रवण स्थळ अशी ओळख असलेल्या यवतमाळ मार्गावरील राजूर फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात 20 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवार दिनांक 13 सप्टेंबर ला सकाळी घडली. An unknown vehicle hit a two-wheeler near Rajur fata on Yavatmal road.

ओम विलास भडके (20) असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तो मारेगाव तालुक्यातील धामणी या गावातील रहिवाशी आहे. बुधवारी सकाळी 10 वाजताचे सुमारास तो दुचाकीने कामानिमित्त वणी कडे येत होता.

यवतमाळ मार्गावरील राजूर फाट्या जवळ विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनाने दुचाकीला धडक दिली. दुचाकी स्वार ओम च्या दोन्ही पायावरून वाहनाचे चाक गेल्याचे बोलल्या जात असून त्याच्या पायांला गंभीर दुखापत झाली आहे. वाहनाने घटनास्थळा वरून पोबारा केला असून जखमी युवकाला वणी येथे उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
Rokhthok News