Home Breaking News चतुर्भुज होण्यापूर्वीच नवरदेवाने केले मतदान

चतुर्भुज होण्यापूर्वीच नवरदेवाने केले मतदान

● लाठी गावात नवरदेवाने वेधले सर्वांचे लक्ष

902
C1 20240419 13093379

लाठी गावात नवरदेवाने वेधले सर्वांचे लक्ष

Wani News | वणी विधानसभेतील लाठी गावात एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याचं मतदानाचं कर्तव्य बजावलं. लग्न मंडपात जाण्यापूर्वी लग्नाच्या वरातीसाठी घोड्यावर बसण्यापूर्वी तो नवरदेव मतदान केंद्रावर पोहचला आणि आधी त्याने मतदानाचा हक्क बजावला. लग्न प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा महत्वाचा प्रसंग पण त्याहून महत्वाचं असतं ते आपल्या देशाप्रती असलेलं कर्तव्य हे तरुणाने सिद्ध केलं. Navardev reached the polling station and first exercised his right to vote.

C1 20240419 13100777
नवरदेव राहुल खिरटकर

महाराष्ट्रातही लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली असून विदर्भात आज मतदान होत आहे. सकाळपासूनच तरूण, वृद्ध, मध्यमवयीन नागरिक, मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडले आहेत. एवढंच नव्हे तर दिव्यांग नागरिकही त्यांचं मतदानाचं कर्तव्य बजवाताना दिसत आहेत.

वणी विधानसभेतील लाठी गावातील एका तरूण मतदाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अंगात शेरवानी, डोक्यावर पगडी अशा वेशभूषेत तो चक्क मतदान केंद्रावर पोहचला यावेळी सर्वांच्या नजरा त्याच्याकडेच वळल्या होत्या. चतुर्भुज होण्यापूर्वी राहूल खिरटकर या तरुणाने प्रथम आपले मतदानाचे कर्तव्य बजावले.

लोकशाहीच्या बळकट व्हावी व योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण मतदान केलं असं राहुलने आवर्जून सांगितल. जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहनही त्याने नागरिकांना केलं. नवरदेवाचा हा उत्साह पाहून लोकं त्याचे कौतुक करत आहेत. चंद्रपूर लोकसभेत माहविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध महायुतीचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात चुरशीची लढत होत आहे.
Rokhthok News