Home क्राईम धाडसी दरोडा, 9 लाखाचा ऐवज लंपास

धाडसी दरोडा, 9 लाखाचा ऐवज लंपास

● शुक्रवारी पहाटे घडला थरार

1331
C1 20240405 14244386

शुक्रवारी पहाटे घडला थरार

Wani News | शहरालगत असलेल्‍या पटवारी कॉलनी मध्‍ये शुक्रवारी पहाटे पाच दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला. धारदार चाकुच्‍या धाकावर घरातील तिघांना बंदी करत तब्‍बल आठ लाख 50 हजाराचे सुवर्णालंकार व 44 हजाराची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवार दिनांक 5 एप्रीलला पहाटे तीन वाजताच्‍या दरम्‍यान घडली. Daredevil robbery, loot of 9 lakhs

सुभाष वासुदेव पिदूरकर हे लालगुडा परिसरातील पटवारी कॉलनी येथे आपल्‍या परिवारांसह वास्‍तव्‍यास आहे. घटनेच्‍या दिवशी ते पत्‍नी व मुलींसह घरात झोपलेले होते. पहाटे तीन वाजताच्‍या दरम्‍यान घराचा दरवाजा तोडण्‍याचा आवाज आल्‍याने ते उठले असता अगदी समोरच पाच अज्ञात दरोडेखोर तोंडाला रुमाल बांधलेल्‍या अवस्‍थेत दिसले.

दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवत त्‍यांना गप्‍प राहण्‍याचे फर्माण सोडले तर दाग दागीने व रोकड कुठे आहे अशी विचारणा केली. घाबरलेल्‍या अवस्‍थेत असलेल्‍या पिदुरकर कुटूंबियांनी रोख रक्कम तसेच सुवर्णालंकार ठेवल्याची जागा दाखवली. दरोडेखोरांनी 8 लाख 50 हजार रुपयांचे दागीने व 44 हजार रुपयांची रोकड घेवून पोबारा केला.

अनपेक्षीतपणे घडलेल्‍या घटनेने पिदुरकर कुटूंबिय प्रचंड घाबरले होते. त्‍यांनी आरडाओरड करत शेजारयांना उठवले तर तातडीने पोलीसांना सुचना दिली. पोलीसांनी घटनेचे गांभीर्य बघता थेट घटनास्‍थळ गाठले. घरातील अस्‍ताव्‍यस्‍त वस्‍तू व घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञात दरोडेखोरां विरूध्‍द तक्रार नोदविण्‍यात आली असुन गुन्‍हा दाखल करण्‍याची प्रक्रीया सुरु आहे. याबाबत पुढील तपास वणी पोलीस करताहेत.
Rokhthok News

Previous articleदिग्गजांची भेट, नेमकं घडलंय काय..?
Next articleत्याने…दुपट्ट्याने लावला गळफास
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.