Home वणी परिसर SDPO गणेश किंद्रे यांनी स्वीकारला पदभार

SDPO गणेश किंद्रे यांनी स्वीकारला पदभार

● आव्हान अवैद्यधंद्यावर आळा बसविण्याचे

826

आव्हान अवैद्यधंद्यावर आळा बसविण्याचे

police officers news | उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांची मुख्यालयात बदली झाली. त्यांच्या जागेवर सातारा जिल्ह्यात कर्तव्यावर असलेले Dysp गणेश किंद्रे यांची वर्णी लागली. शुक्रवार दि. 26 मे ला दुपारी ते वणीत दाखल झाले आणि लगेचच त्यांनी पदभार स्वीकारला आहे. The police administration itself has to be proactive to curb the illegal business and it does not seem to be happening.

वणी उपविभाग पोलीस प्रशासनासाठी आव्हानात्मक (Challenging) ठिकाण अजिबात नाही. येथे सामाजिक एकोपा तर आहेच शिवाय सर्वधर्मसमभावाला जपणारे समाजबांधव आहेत. सर्वधर्मीय सन उत्सव धडाक्यात साजरे होत असताना अन्य धर्मीय नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवतात ही संस्कृती येथील समाजबांधवांनी जपली आहे.

Img 20250103 Wa0009
C1 20250418 20491706

वणी उप विभाग औद्योगिकदृष्टया अग्रेसर आहे. येथील भूगर्भात असलेल्या मौल्यवान खनिज संपत्तीमुळे विविध उद्योग धंदे स्थापित झाले आहे. आर्थिक संपन्नता असल्याने अवैद्य व्यवसायाला आपसूकच चालना मिळते. अवैद्य व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनालाच तत्पर असावं लागतं आणि तसं होतांना दिसत नाही.

उपविभागातील वणी व शिरपूर ठाण्याची महती काय वर्णावी, जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना आकर्षित करणारे हे ठाणे आहेत. तसं बघितलं तर उपविभागातील पाचही पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पर्वणी ठरणारी आहेत.

नव्यानेच रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्यासमोर खरे आव्हान असणार आहे अवैद्य व्यवसायावर आळा बसविण्याचे. उपविभागात कोळसाचोरी,  भंगारचोरी, कोंबड बाजार, गोवंश तस्‍करी, गुठखा तस्‍करी तसेच मटका व जुगार बोकाळणार नाही यांची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत रहावी याकरीता कठोर आणि दक्ष राहावे लागणार आहे.
Rokhthok News