Home वणी परिसर “विद्यानगरी” कडे पालिकेचे दुर्लक्ष

“विद्यानगरी” कडे पालिकेचे दुर्लक्ष

143
Img 20240528 Wa0018

स्थानिक लोकप्रतिनिधी उदासीन

वणी बातमीदार: वणी शहरात अंतर्गत रस्त्याची कामे मोठया प्रमाणात सुरू असताना विद्यानगरी कडे पालिकेचे होणारे दुर्लक्ष स्थानिक नागरिकांना अचंबीत करणारे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचा हा परिपाक आहे. रस्ते चिखलाने माखले असून नागरिक संताप व्यक्त करताहेत.

वणी नगर पालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. शहरात मोठ्याप्रमाणात विकासकामे होत आहे. अनेक प्रभागातील रस्ते चकाचक झालेली असताना विद्यानगरी ला सापत्न वागणूक का मिळत आहे हे कळायला मार्ग नाही. पावसाळ्याचे दिवस आहे, संततधार पाऊस पडतोय यामुळे विद्यानगरीतील रस्ते पायदळ चालण्यायोग्य नाही. वाहनचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. पालिका प्रशासनाने तात्पुरती डागडुजी करावी अशी रास्त मागणी स्थानिक नागरिक करताहेत.