Home Breaking News तीन वाहनांचा विचित्र अपघात

तीन वाहनांचा विचित्र अपघात

428

एक जखमी, मोठी हानी टळली

वणी बातमीदार:- शहराच्या लगतच असलेल्या लालगुडा गावाजवळ ट्रक, कार व मालवाहू अश्या तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात मालवाहू वाहनाचा चालक जखमी झाला आहे.

घुगूस वरून एम एच 49 – 1218 या क्रमांकाचा ट्रक कोळसा भरून वणी कडे येत होता. तर याच मार्गाने ट्रक च्या बरोबरीत कार क्रमांक एम एच 43 बी आर 8688 ही वणीच्या दिशेने येत होती. ट्रक चालकाने वाहन वळविल्याने ट्रक ची कारला धडक झाली त्यामुळे ट्रक चालकाचा वाहनवरून ताबा सुटला व ट्रक थेट रस्ता दुभाजकावर चढला.त्याच वेळेला वणी कडून येत असलेल्या पिकअप वाहन क्रमांक एम एच 40 वाय 8163 ला धडक दिली.

यामुळे पिकअप वाहन व ट्रक रस्त्याच्या खाली उतरले यामध्ये पिकअप चा वाहन चालक जखमी झाला असून त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मात्र कार मधील सर्वजण सुखरूप बचवल्याने मोठी हानी टळल्याचे  बोलले जात आहे

Img 20250103 Wa0009
C1 20250418 20491706