● उभ्या ट्रकला जबर धडक
वणी: मारेगाव तालुक्यातील मार्डी लगत भरधाव दुचाकीस्वार उभ्या ट्रक ला धडकला. यात त्या इसमाच्या डोक्याला जबर दुखापत झाली. अती रक्त स्त्रावामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. 3 सप्टेंबर ला रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली.

संजय पांडुरंग धारणे (48) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी इसमाचे नाव आहे. ते किन्हाळा येथील निवासी होते. घटनेच्या दिवशी आपली दुचाकी क्रमांक MH- 40- D 6382 ने चिंचमंडळ कडून गावी परतत असताना मार्डी खैरगाव रस्त्यालगत उभा असलेल्या ट्रक ला दुचाकी धडकली.
घडलेला अपघात भीषण होता या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. अती रक्त स्त्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांना सूचित करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. मृतकाच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा आप्तपरीवार आहे.
वणी: बातमीदार