● रात्री 9: 30 वाजता होणार अंत्यसंस्कार
रोखठोक | येथील प्रतिष्ठित नागरिक सुनील नामदेवराव गंधारे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 47 वर्षाचे होते ते येथील सदाशिव नगर मध्ये वास्तव्यास होते. त्यांचेवर नागपूर येथील Kingsway hospital मध्ये उपचार सुरू होते. Sunil Namdevrao Gandhare passed away

सुनील गंधारे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांचा राजूर येथे व्यवसाय होता. ते मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांचेवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचे पश्चात आई, पत्नी, भाऊ व दोन मुले असा मोठा आप्तस्वकीय परिवार आहे. त्यांचेवर शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)